लहू चव्हाण
पाचगणी : पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या निवडणुक २०२२ करीता दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशानुसार समर्पित आयोगाने निश्चित केलेल्या टक्के वारी नुसार आज पांचगणी नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण चिट्टीद्वारे जाहीर करण्यात आले. या आरक्षणात केवळ तीन जागांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
आयोगाच्या निर्देशानुसार सोडत आरक्षण सोडत नियंत्रक अधिकारी राजेंद्रकुमार जाधव उपविभागीय अधिकारी वाई, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगरपालिका शाळेतील मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.
यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष १ असे आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वसाधारण पुरुष ७ सर्वसाधारण महिला ६ अनुसूचित जाती जमाती ४ जागा पहिल्याच आरक्षित केल्या आहेत. आजच्या आरक्षणाने मात्र मात्तब्बर लोकांची गोची झाली आहे. या अगोदर प्रारूप प्रभाग रचने नंतर यामध्ये सर्वसाधारण पुरुष ८, अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण २ , अनुसूचित जाती जमाती महिला २ , सर्वसाधारण महिला ८ असे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण घेतले गेले नव्हते.
प्रारंभी प्रभाग ९, ३ ,२ व ८ हे प्रभाग अबाधित ठेवून उर्वरित प्रभाग १,४,५,६,७,१०, यामधून चिठ्ठीद्वरे नागरिकांचा मागास प्रवर्ग निश्चित करण्यात आला. यामध्ये ४, ६, ७ हे निवडण्यात आले. त्यानंतर पुन्हा चिठ्ठीद्वरे शालेय मुलांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ४ अ, ६ अ, यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव म्हणून निवडण्यात आले. ७ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष जाहीर करण्यात आला. त्यानंतर नियमानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रभाग १ (अ.. सर्वसाधारण महिला राखीव ब…. सर्वसाधारण ),
प्रभाग २ (अ…अनुसूचित जाती महिला राखीव, ब….सर्वसाधारण ),
प्रभाग ३ (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण ब…. सर्वसाधारण महिला )
प्रभाग ४ (अ ना. मागास प्रवर्ग महिला ब….सर्वसाधारण )
प्रभाग ५ ( अ.. सर्वसाधारण महिला ,ब…. सर्वसाधारण )
प्रभाग ६ (अ). ना. मागास प्रवर्ग महिला महिला ,ब…. सर्वसाधारण ),
प्रभाग ७ (अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग ,ब…. सर्वसाधारण )
प्रभाग ८ (अ.. अनुसूचित जाती महिला राखीव, ब…. सर्वसाधारण )
प्रभाग ९ (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब…. सर्वसाधारण महिला )
प्रभाग १० (अ.. सर्वसाधारण महिला ,ब…. सर्वसाधारण )
दरम्यान, या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात ‘ कही खुशी कही गम ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काहीना आपला पूर्वीचा प्रभाग, व हक्काचा विभाग आरक्षणामुळे गमवावा लागणार असल्याने त्यांना इतर प्रभागात स्थलांतरित होवून आपले नशीब आजमवावे लागणार आहे.