अजित जगताप
Satara News : सातारा : छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक गड- किल्ले उभारणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे वडार समाज आहे. हा समाज सत्तेपासून अनेक कोस दूर होता. त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ नव्हते. यासाठी वडार समाजाचे नेते पिराजी मंजुळे यांनी स्वतंत्र महामंडळाची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून आमदार अभिमन्यू पवार यांनी यंदाच्या या नवीन अर्थसंकल्पात त्याची तरतूद करून पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी अभिनंदनचा ठराव केला. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह अनेक मान्यवर नेत्यांची भेट घेतली. वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ३ ऑगस्ट, २०१८ रोजी लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वडार समाजाच्या मेळाव्यापासून पाठपुरावा सुरू होता. याबाबत झालेल्या पाठपुराव्याबद्दल वडार समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महामंडळ स्थापन करून वडार समाजाला न्याय मिळवून दिला आहे. असा ठाम विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे. २०११ नंतर वडार समाज्याची जनगणना झाली नाही.ओडिया राज, ओड्र,वडर, वडार, वडरी असे काही जण बोलत असतात.”” वच्यार वच्या वड्डा वच्याड”’म्हणजे ”’आला रे आला वडार आला” अशी घोषणा केली जाते. शिवकालीन काळात वडार समाज्यातील हिरोजी इंटळकर यांनी रायगड किल्ला बांधला. पण,लेखणीचा गधं नसल्याने त्याची नोंद घेतली नाही. असे काहींचे मत झाले आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वडार समाज्यातील धाराशिव येथील जेष्ठ नेते पिराजी मंजुळे व त्यांचे समाजबांधव,लातूरचे भाजप आ. पवार यांनी वडार समाज्यासाठी स्वतंत्र महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. असे ही श्री. श्रीकांत देवकर यांनी सांगितले.यानिमित्त वडार समाज्याच्या वतीने जेष्ठ नेते पिराजी मंजुळे व आ अभिमन्यू पवार ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा नागरी सत्कार घेण्यात येईल असे ही स्पष्ट केले आहे.