पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिरीटवर हा निर्णय घेतला जाईल. या निर्णयासाठी कोणताही कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. असे राहुल नार्वेकर यांनी टीव्ही 9 चॅनेलशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयाची निरीक्षणे…
– सत्ता संघर्षाचे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे
– गटनेत्यापेक्षा राजकीय पक्षाने दिलेला व्हिप 10 व्या सुचीसाठी
– व्हिप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतो.
– भरत गोगावले यांची नियुक्त बेकायदा, प्रतोदपदी निवड बेकायदा
– राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचे
– राज्यपालांनी बहुमत चाचणीला बोलवणे चुकीचे
– राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते
– ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणले असते.
– 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Sanjay Raut : नैतिक जबाबदारी स्वीकारुन एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा : खासदार संजय राऊत
Breaking News : महाराष्ट्र सत्तासंघर्ष ! शिंदे गटाला मोठा धक्का ; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर