Swarda Bapat पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. (Swarda Bapat) या जागेसाठी लोकसभेची निवडणूक जाहीर कधी होणार असा प्रश्न राजकीय पक्षांसह पुणेकरांना पडला आहे. (Swarda Bapat) या जागेवर भाजपसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दावा केला आहे. विधानसभेची पार्श्वभूमी पाहता आता बापट कुटुंबियातीलच व्यक्तीला उमेदवारी देणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात असताना स्वरदा बापट (Swarda Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Swarda Bapat)
निवडणूक जिंकण्याचा विश्वास केला व्यक्त
स्वरदा बापट Swarda Bapat यांनी पुणे प्राईम न्यूजशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
स्वरदा म्हणाल्या, सेल्फ लास्टचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश बापट आहेत, त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे येणार आहे. तसेच जशी कसब्याची निवडणूक झालीय तशाच दोन निवडणुका एकसारख्या कधीच होणार नाहीत. त्यामुळे कसब्यासारखी परिस्थिती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत होईल, असे मला वाटत नसल्याचे स्वरदा बापट यांनी स्पष्ट केले आहे.
माझ्या म्हणण्याप्रमाणे ही पोटनिवडणूक होणार नाही, यावर पक्षच निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण गिरीश बापट यांचं अपूर्ण काम पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी पार पाडण्याची मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्या काय होईल? कोणी सांगू शकत नसल्याचं (Swarda Bapat) स्वरदा बापट म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना त्यांनी गिरीश बापट यांचा शेवटचा काळ कसा होता. यावर त्यांनी भाष्य केलंय. त्या म्हणाल्या, गिरीश बापटांचं व्हिजन खूप मोठं होतं. बापटांनी आयसीयुमधल्या शेवटच्या दिवसापर्यंतही काम केलंय. 29 तारखेला त्यांचं निधन झालं पण 28 तारखेपर्यंत त्यांच्याकडे सह्यांसाठी पेपर येत होते. ही गोष्ट अविश्वसनीय आहे, त्यांना त्रास होत होता तरीही त्यांनी कामे केली असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमच्यासोबत आहेत, असा मेसेज देण्यासाठी घरी आले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना स्वरदा बापटांनी कसबा पेठ निवडणुकीत गिरीश बापटांना प्रचारासाठी मैदानात उतरवण्यात आलं होतं. त्यावरही स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
गिरीश बापट यांनी आमच्यासह पक्षातील नेते प्रचारासाठी बाहेर पडू नका, असं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यांच्या मनातला कार्यकर्ता आणि पक्षासाठी असलेली निष्ठा मोठी होती. त्यामुळे त्यांनी शारिरिक परिस्थितीकडे न पाहता शेवटच्या क्षणापर्यंत पक्षासाठी काम केलं असल्याचं विधान स्वरदा बापट यांनी केलं आहे.