Pune News : शिरूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर करत असताना व टंचाईला सामोरे जात असताना पाण्याचा काटकसरीने वापर करावा. असे आवाहन आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुदंकर यांनी केले. आहे. (Pune News)
पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्याबाबत सहकारमंत्री वळसे पाटील साहेब यांना विनंती…
कान्हुर मेसाई ( ता. शिरुर ) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्यामूळे सदर गावामधे टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. असे निवेदन कान्हूरच्या सरपंच चंद्रभागा खर्डे यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांना नुकतेच देण्यात आले होते. (Pune News)
संबधीत मागणी पत्र आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांनी कान्हूर गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्याबाबत सहकारमंत्री वळसे पाटील साहेब यांना विनंती केली होती. त्यानूसार शनिवार (ता.२९) रोजी कान्हुर मेसाई (ता.शिरुर) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यावेळी पाचुंदकर यांनी नागरिकांना आवाहन केले (Pune News)
दरम्यान, या टँकरचे पुजन पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune News) यावेळी कान्हुर मेसाई गावच्या ग्रामस्थांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व अॅड. प्रदीप वळसे पाटील यांचे आभार मानले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबनराव शिंदे, उपाध्यक्ष किसान सेल राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सुधीर पुंडे, कान्हूर मेसाईच्या सरपंच चंद्रभागा खर्डे, उपसरपंच योगेश पुंडे,कान्हूरचे माजी सरपंच दादासाहेब खर्डे, बंडू पुंडे, दिपक तळोले, माजी उपसरपंच संदीप तांबे, ग्रामपंचायत सदस्य मोहनराव पुंडे, विजय घोलप, सोपान पुंडे, ग्रामपंचायत सदस्या असिया अल्ताफ तांबोळी, राजेश्री काळूराम रुपनेर, सोसायटीचे संचालक सुदाम तळोले, पप्पू तळोले, प्रमोद कोहकडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.