Pune News : पुणे : राजकारणात एकमेकांवर होणाऱ्या कुरघोड्या नवीन नाहीत. आता एका वेगळ्याच कारणाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका भाषणातील तीन सेकंदांचा व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे म्हणत आहेत की, “गद्दारी तर महाराष्ट्राच्या रक्तातच…”, भाषणाचा हाच भाग दोन वेळा जोडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या रक्तातच गद्दारी आहे…” असे बोलून सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचाच अपमान केला आहे.
दरम्यान, भाजपच्या ट्वीटला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे की, “असे अर्ध्यात काटछाट केलेले सहा सेकंदांचे व्हिडीओ टाकून जनतेची दिशाभूल करणे थांबवा. हा पूर्ण व्हिडीओ भाजपाने ट्विटरवर टाकण्याची हिंमत दाखवा. असे फुकटचे एडिटिंग ॲप्स बाजारात रोज येत असतात!”
सुप्रिया सुळे ५ जून रोजी इंदापूरमधील बोराटवाडी या गावच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. (Pune News) त्यावेळी त्यांनी तिथल्या स्थानिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या अडखळल्या. त्यातलाच तीन सेकंदांचा भाग दोन वेळा जोडून सहा सेकंदांचा व्हिडीओ ट्विटवर भाजपाने शेअर केला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या शिंदे सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांच्या इच्छेविरोधात शिंदे सरकार तयार झालं आहे. आपल्या राज्यात यशवंतराव चव्हाण होऊन गेले. हिमालयाला गरज पडेल तेव्हा सह्याद्री मदतीला धावून जाईल असं ते म्हणायचे. (Pune News) चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना बोलावून घेतलं, तेव्हा ते पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. परंतु आताच्या सरकारचं काय, तिकडे हिमालयाने डोळे वटारून पाहिलं की आपला सह्याद्री घाबरला. दिल्लीने हाक मारली के हे पळतंय तिकडे. यांच्या स्वाभिमानाला काय झालंय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
काय आहे मूळ व्हिडीओ?
या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. यात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गद्दारी करण्यासाठी आमदारांना भाजपाने प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले. ४० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये म्हणजेच २,००० कोटी रुपये दिले. २,००० कोटी रुपयांसाठी यांनी गद्दारी केली. आपलं सरकार पडलं नसतं आणि ते दोन हजार कोटी रुपये इंदापूरमध्ये आले असते तर तुमच्या आयुष्यात किती बदल झाला असता.
सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, त्यांनी दोन हजार कोटी रुपयांची घरं घेतली, गाड्या घेतल्या, बायकोला दागिने केले. आपल्या सरकारने मात्र या पैशात विकास केला असता, रस्ते बांधले असते, चांगल्या एसटी तुमच्या सेवेसाठी आणल्या असत्या, चांगल्या शाळा आणि आरोग्य केंद्र उभारली असती. (Pune News) यांनी २,००० कोटी रुपयांसाठी गद्दारी केली, गद्दारी तर महा..महारा..महाराष्ट्राच्या रक्तातच आहे आणि हा आपला महाराष्ट्र आहे. मराठी माणसाचा… मराठी माणूस म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो, पण यांनी गद्दारी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अनाथ मुलीला धमकावून पाच वर्षे बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News : बिनव्याजी कर्जाच्या बहाण्याने तिघांना गंडा घालणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या