Pune News : पुणे : हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. पालखी मुक्काम असलेल्या ठिकाणी अनेक भाविक वारकऱ्यांप्रती आपली सेवा अर्पण करतात. पुण्यातील पालखी विसावास्थळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील वारकऱ्यांची सेवा करताना दिसल्या. त्यांनी वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या. चपाती लाटतानाचा व्हिडीओ त्यांनी फेसबुक पेजवर शेअर केला आहे. याबद्दल चाहत्यांनी त्यांची वाहवा केली आहे. (Sushma Andhare rolled chapattis for the warkaris; Criticism of Shinde group…!)
आषाढी वारीसाठी पंढरपुरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोमवारी पुण्यात आगमन झालं. मंगळवारी पालख्या पुणे मुक्कामी होत्या. पुणेकरांनी मोठ्या उत्साहात या दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं. या वेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची सेवा केली. (Pune News) त्यांनी वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या. त्यांनी याचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्या वारकऱ्यांसाठी भराभर पोळ्या लाटताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
सरड्यालाही रंग बदलण्यात मागे टाकले
दरम्यान, राजकारणात कोणतीही गोष्ट घडली की त्यावर प्रतिक्रीया उमटतेच. अंधारे यांच्या या व्हिडीओवरून शिंदे गटाने अंधारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, सुषमा अक्का यांनी सरड्यालाही रंग बदलण्यात मागे टाकले आहे.(Pune News) हिंदू धर्माविषयी बोलणाऱ्या, वारी, वारीची परंपरा, वारीमध्ये जाणाऱ्या महिलांबद्दल, संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल इतर संतांबद्दल बोलणाऱ्या, अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या तुम्हीच होता ना, असा सवालही वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन ३ आरोपींनी केला ३६ वर्षीय व्यक्तीचा खून