(Pune News) पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा चालवाचे. (Chief Minister of the state Eknath Shinde used to drive a rickshaw) त्यामुळे ते रिक्षा चालकांसाठी नक्कीच काहीना काही योजना आणतील असा विश्वास रिक्षा चालकांचा होता. तसेच रिक्षा चालकांची तशी मागणी अनेक दिवसांपासूची होती. त्यासाठी रिक्षा चालक- मालक संघटनांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. तसेच वेळोवेळो आंदोलने देखील होती. अखेर त्यांची मागणी मान्य झाली असून शिंदे- फडणवीस सरकारे रिक्षा चालकांना सुखद धक्का देत रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी अनेकवर्षांपासून प्रलंबित कल्याणकारी मंडळाची (corporations)घोषणा केली आहे. तसेच असंघटित कामगार क्षेत्रातील 3 करोड हुन जास्त कामगारांसाठी सुद्धा कल्याणकारी मंडळ व विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे.
काय केली घोषणा –
– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
– प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार
महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र कामगार सभा तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे महाराष्ट्र सरकारने मनःपूर्वक धन्यवाद ! येत्या काळामध्ये या योजना कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात त्याचा फायदा असंघटित क्षेत्रातील कामगारांना होईल, अशी आशा आम्ही व्यक्त करत आहोत.
– डॉ. केशव नाना क्षीरसागर.
अध्यक्ष : महाराष्ट्र कामगार सभा.
अध्यक्ष: बघतोय रिक्षावाला संघटना.