पुणे : डिजिटल शैक्षणिक मासिक ‘eduतंत्र’च्या ऑक्टोबर २०२२ अंकाचे प्रकाशन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन आज करण्यात आले. यावेळी मासिकाचे मुख्य संपादक उमेध धावारे, कार्यकारी संपादक दीपिका एरंडे, डॉ.पूनम कडलग, उपसंपादक रंगनाथ औताडे, मोहम्मदी काझी, संपादक सागर शिंदे, गणेश शिंदे, नामदेव पांचाळ, पृथ्वीराज काळे, रजनीकांत मेंढे, आयुब शेख आदी मान्यवर य्पास्थित उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मासिकाच्या कामकाजाची आणि पार्श्वभूमीची माहिती घेतली व पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात सर्व स्तरातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून रहावेत या उद्देशाने सुरु झालेले हे मासिक आज जवळपास तीन वर्ष अविरत शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहे. शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, आणि अध्यापनात वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान या याबाबत eduतंत्र मासिकात मागर्दर्शन आणि माहितीपर लेख प्रसिद्द केले जातात. त्याच बरोबर जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल आणि त्याचे परिणाम यावर देखील भाष्य केले जाते.