मुंबई : Politics – माजी मुख्यमंत्री आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर चांगलेच संतापले. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची चौकशी केली. (Politics) त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उल्लेख लाचार, लाळघोटेपणा करणारा ”फडतूस” गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशी टीका केली. त्या ठाकरे चांगलेच संतापले असल्याचे बोलले जात आहे. (Politics)
‘आमचे गृहमंत्री ‘फडतूस’नाही ‘काडतूस’ आहेत’; भाजप
उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे भाजपमध्ये वातावर पेटले असून नेते आक्रमक झाले आहेत. ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपमधून काय प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष लागून राहिले होते. त्यातच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीकेला प्रत्युत्तर देणारे ट्विट केले आहे.”आमचे गृहमंत्री ‘फडतूस’नाही ‘काडतूस’ आहेत, असे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्वीट पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाही ‘काडतूस’ आहेत ! मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला आहे. कोणत्याही मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण अशा खूनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनीच रोवली.
निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे, हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी? आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.
अधिक राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील बातम्या वाचा
Politics | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जहरी टीका