Politics मुंबई : आपल्या देशात शेतकरी आंदोलन सुरू होतं, तेव्हा मोदी सरकारने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना धमक्या दिल्या. (Politics) शेतकरी आंदोलनाची बाजू घेणारे ट्वीट डिलीट करा, नाहीतर भारतातील ट्विटरच्या कार्यालयात धाडी टाकू, तुम्हाला त्रास देऊ, अशी धमकी मोदी सरकारने दिली. (Politics)
उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला जोरदार हल्लाबोल
स्मृती इराणींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून इराणींनी वृत्तपत्राच्या मालकाशी बोलून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला नोकरीवरून काढलं. आपण कोणत्या दिशेनं चाललोय, हे आपल्याला तरी कळतंय का?, असे सांगत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
वरळी येथे झालेल्या ठाकरे गटाच्या शिबीरात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, हिटलरसुद्धा असाच माजला होता. हिटलर म्हटलं की त्याच्या छळछावण्या, अनेक लोकांची केलेली कत्तल हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण हिटलर काही अचानक जन्माला आला नाही, हे लक्षात घ्या. त्याने सत्तेत आल्या-आल्या लगेच छळ छावण्यांचं टेंडर काढलं नव्हतं. पहिल्यांदा त्याने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणायला सुरुवात केली. अतादेखील तसेच होत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आपल्या विरोधातील बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत, ही काळजी त्याने सर्वप्रथम घेतली. त्यानंतर एक-एक करत ते विरोधी पक्ष संपवत गेले. विरोधी पक्षांच्या समर्थकांचा छळ सुरू केला. सत्य काय आहे? हे एकच पक्ष ठरवायला लागला. जे सत्य आहे, ते दडपून टाकायचं आणि आम्ही म्हणू तेच सत्य आहे, असं हिटलरचा पक्ष ठरवू लागला.
दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं डोळ्यादेखत घडत असताना सर्वसामान्य जनता निपचित पडून राहिली. तेव्हा हिटलर माजला. त्यामुळे आपल्या देशाची वाटचालही हिटलरशाहीच्या दिशेनं चालली नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण हिटलरचं चिन्हही स्वस्तिक होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.