Politics News मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता. १७) सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांसह इतर पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर चौफेर टीका केली. (Politics News) चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य आहे. (Politics News) घटनाबाह्य सरकारच्या चहापानात आम्हाला स्वारस्य नाही. (Politics News) त्यामुळे सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. (Politics News)
दरम्यान, विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षांचे अन्य नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने मागील वर्षी कांदा उत्पादकांना ३१ मार्चपर्यंत ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप हे अनुदान मिळालेले नाही.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे सरकार अद्याप ५० हजार प्रोत्साहन अनुदान देऊ शकलेले नाही. कापसाचे दर १२ हजार रुपयांहून ६ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. अतिवृष्टीचा संपूर्ण निधी अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही. एनडीआरएफचं अनुदान अद्याप मिळालं नाही. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
राज्यात गेल्या एका वर्षात तब्बल बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या या आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारमधील मंत्री अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोट्या कारवायांच्या माध्यमातून वसुली करत आहेत. संजय राठोड यांनी माझ्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य केले होते यावरून हे सरकार भ्रष्टाचारी असल्याची टीका देखील दानवे यांनी केली.
राज्यात गेल्या वर्षभरात चार हजाराहून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबईत शासकीय वसतिगृहातील मुलीवर सुरक्षारक्षकानेच अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना, पुणे येथील मुलीवर करण्यात आलेला चाकू हल्ला, एमपीएसी उत्तीर्ण मुलीचा राजगडाच्या पायथ्याशी करण्यात आलेला खून या सारख्या घटनामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार पुरस्कृत दंगली घडल्या आहेत. अकोला, शेवगाव, संभाजीनगर, संगमनेर, कोल्हापूर, मालेगाव येथे दंगली घडल्या. या सर्व दंगली सरकार पुरस्कृत आहेत की, काय अशी शंका येत असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.
राज्यात ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. या तपास यंत्रणाचा वापर करून विरोधी पक्षांना संपविण्याचे काम सुरु आहे. समृद्धी महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे परंतु या सरकारकडून हे अपघातात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी आहे की लोकांचा जीव घेण्यासाठी? असा सवाल यावेळी दानवे यांनी केला.
राज्यात बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. शेतीची अवस्था बिकट आहे. दुबार पेरणी देखील आता शक्य नाही. दुष्काळाचा परिणाम शहरी भागात महागाई वाढली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.
या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासहित आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटना बाह्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.