(Politics) शिवाजीनगर, (पुणे) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याने भाजप पदाधिकाऱ्याने अजित पवार यांच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रवींद्र सळगावकर असे तक्रार दिलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हंटलं आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार…!
शिवाजीनगर मतदार संघातील भाजपचे अध्यक्ष रवींद्र सळगावकर यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हंटलं आहे.
गणेशखिंड रस्त्यावर ई स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार दिली आहे. या प्लॉटची मोजणी करण्यासाठी अजित पवार यांनी दबाव आणला आहे. अर्थात ही मोजणी करता येत नाही. तर या प्लॉटच्या फाइलवर पवारांचं नाव लिहून ठेवण्याचा आरोप सळगावकर यांनी केला तसेच त्याची मी माहिती घेतोय याला विरोध करतोय त्यामुळे अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. रवींद्र सळगावकर यांनी त्यांच्या लेटर हेडवर तक्रार लिहून खडक पोलिसांना दिली आहे. यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics | उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत!; अन्यथा; चंद्रकांत पाटील म्हणाले
Politics News: पुण्यात भाजपचा शिवसेनेला धक्का : निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा भाजपात प्रवेश