Politics पुणे : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी वारजे येथील आपल्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..!
संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर घर आहे. तेथील इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय आहे. बराटे हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात होते. त्यांची पत्नी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात गेल्या.
तेव्हा संजय बराटे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. कार्यालयात पोलिसांनी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. वारजे पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.