Politics मुंबई : महाविकास आघाडीची जंगी सभा ”वज्रमुठ” रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे जंगी सभा पार पडली. या सभेतून आघाडीच्या नेत्यांनी आरोपांची चांगलीच बॅटींग केली होती. त्यानंतर आज दिवसभर भाजपा आणि शिंदे गटातील नेते प्रत्यारोप करत असल्याचे दिसून आले आहे. संभाजीनगरमधील ज्या मैदानावर महाविकासआघाडीची सभा झाली. ती जागा अपवित्र झाल्याचा आरोप भाजपच्या कार्य़कर्त्यांनी करुन मैदानाव गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न केला. यामुळे आता पुन्हा राजकारण तापणार आहे.
स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सभेच्या मैदानावर गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार
स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सभेच्या मैदानावर गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात या कार्यकर्त्यांनी एक चॅनेलशी संवाद साधत भूमिका मांडली आहे.
“बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र चरणांनी हे मैदान पवित्र झाले आहे. त्यांची आम्हाला शिकवण होती की राष्ट्रवादी आणि काँग्रेस पूर्णपणे गाडली पाहिजे. याच विचारावर आम्ही आजपर्यंत काम करत आलो. त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घेऊन उद्धव ठाकरे इथे सभा घेत असतील तर हे मैदान अपवित्र झाले आहे. असे एका कार्यकर्त्यांने सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन इथे सभा घेतली. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांचे अपवित्र पाय इथे लागले आहेत. ते मैदान आम्ही शुद्ध करण्याचे काम करतोय. १९८८ साली बाळासाहेब ठाकरेंनी याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरून हिंदुत्वाची घोषणा दिली होती. पण काल वज्रमूठ सभेच्या माध्यमातून हे मैदान अपवित्र झाले आहे. हे मैदान गोमूत्र शिंपडून ते पवित्र करणार आहोत. याच ठिकाणी हिंदुत्वाचा नारा देऊन छत्रपती संभाजीनगर हे नाव पुढे नेणार आहोत. असेही त्यांचे म्हणणे आहे.