Political News : मुंबई : राष्ट्रवादीत प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार दाखल झालेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झालेत… पाटील राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्यास जयंत पाटील यांची नाराजी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.(Political News)
राष्ट्रवादीत प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत.
विरोधी पक्षनेतेपदात मला रस नाही. मला पक्ष संघटनात्मक जबाबदारी द्यावी, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अजित पवार प्रदेशाध्यक्षपद पदासाठी इच्छुक आहेत, अशा चर्चांना वेग आला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादीमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.(Political News)
अजित पवार यांनी राज्यातील सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावलं आहे. आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत अजित पवार हे आज बैठक घेणार आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे.(Political News) ही बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडत आहे. या बैठकीमध्ये आगामी पावसाळी अधिवेशन आणि प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदात रस नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलं होतं की, पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करून अजित पवारांच्या मागणीवर निर्णय घेऊ. त्यानंतर शरद पवार यांनी सहा जुलै रोजी राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीमध्ये अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा देखील सुरू आहे.(Political News)