Political News : मुंबई : वांद्रे येथील शिवसेना ठाकरे गटाची शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून आगदी हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.(Political News)
शाखा सूड भावनेने पाडल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाची ही शाखा ४० वर्षे जुनी आहे. १९९५ नंतर निर्माण झालेल्या झोपड्यादेखील महापालिकेने अधिकृत केल्या आहेत. मात्र, ही शाखा सूड भावनेने पाडल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.(Political News) गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेनं कारवाई करत आहेत. हे योग्य नाही, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.(Political News)
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कारवाईवेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची कारवाई सुरू होताच शिवसैनिकही तेथे जमले. (Political News)वॉर्ड क्रमांक ९६ जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचं हे कार्यालय आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कार्यालयावर आता कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय तोडण्यात येत आहे. नगरसेवक हाजी हलीम खान यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. १० कोटींची ऑफर नाकारल्यामुळे ही कारवाई झाल्याचं हाजी हलीम खान यांनी म्हटलं आहे.(Political News)
दरम्यान, या कारवाईपर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. मला शिवसेनेनं ऑफर दिली ती मी नाकारली, म्हणून महापालिकेने ही कारवाई केली. पण मी उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत राहिल, असं हाजी हलीम खान यांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी विनाकारण ठाकरे गटाला त्रास देण्यासाठी ही कारवाई करत आहेत. आमची शाखा अधिकृतच आहे. मागच्या ४० वर्षांपासून ही शाखा येथे आहे. आताच ही कारवाई का होतेय? जाणून बुजून आणि सूडाच्या भावनेनं ही कारवाई करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली.(Political News)