Political News : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने थेट सत्तेत सामील होणारे अजित पवार हे दुसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या शपथविधीला पाठिंबा दिलेला नाही.(Political News)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
यापूर्वीदेखील विरोधीपक्षनेतेपदावरून थेट सरकारमध्ये सहभागाच्या घटना घडल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Political News) राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यात भाजप आणि शिवसेना युती सरकारचे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता.
अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय विखे पाटील यांच्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये सामील झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदाच थेट विरोधी पक्षनेते यांना आपल्या गटात खेचले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सत्तेत सामील झाल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.(Political News)
दरम्यान, आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीये.(Political News)