Political News : मुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर ठाकरे गटाला अनेक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षात अस्वस्थता असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहेत. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर ठाकरे आणि राऊत कोर्टात हजर राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.(Political News)
उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच राज्यात मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.(Political News) मुंबई महापालिकेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका भाजपला ठाकरे गटाच्या हातून खेचायची आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष वाढताना दिसतोय. दोन्ही बाजूने एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांप्रकरणी दोन्ही बाजूने न्यायालयीन लढाई देखील लढली जातेय. विशेष म्हणजे या न्यायालयीन लढाईतील एका प्रकरणात ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.(Political News)
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या आरोप प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत. राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काही मजकूर छापून आला होता.(Political News) या मजकुरावर राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या मजकुराविरोधात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे.
याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ठाकरे आणि राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी १४ जुलैला कोर्टात हजर राहावे, असा आदेश देण्यात आला आहे.(Political News)
दरम्यान, ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात १ जुलैला ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोविड सेंटरचं कंत्राट देण्यापासून ते अनेक वस्तूंच्या खरेदी-विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून केला जातोय. याप्रकरणी ईडीची कारवाईदेखील सुरु आहे. आता पुढे काय घडतेय, ते पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.(Political News)