लहू चव्हाण
पाचगणी : जोपर्यंत पक्षाला परिवार समजणार नाहीत तोपर्यंत भाजप समजणार नाही. संघटन हेच पक्षाचे बलस्थान आहे. येथे पदापेक्षा सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. महाबळेश्वर तालुक्यात भाजपाचा झंजावात आहे, कारण विकासाचे परिवर्तन आहे. त्यामुळेच राजकारणातील दडपशाहीला झुगारून लोक भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
पांगारी (ता.महाबळेश्वर) येथे भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा, ग्रामस्थांचा जाहीर प्रवेश व भाजप शाखा नामफलक उद्घाटन सोहळा प्रसंगी ना.पाटिल बोलत होते. यावेळी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे माजी आमदार मदन भोसले, मंगेश उपाध्याय, युवा नेते विकास शिंदे, प्रदेश सदस्य अविनाश फरांदे, जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, यशवंत लेले, तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे, जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, महिला आघाडी उपाध्यक्ष वैशाली भिलारे, किसन भिलारे, अनिल भिलारे, जगन्नाथ भिलारे, माजी सभापती विजयराव भिलारे, संतोष धनावडे, रवी दानवले, जगन्नाथ दानवले, विकास दानवले, प्रदिप दानवले, संतोष गोळे, पवन गोळे, पुनम भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यात अनिल भिलारे यांच्या पासून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पांगरी ग्रामस्थांनी अतिशय योग्य वेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश लोकांच्या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे. विद्यमान आमदार आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचे कार्य करीत आहेत, असे माजी आमदार मदन भोसले म्हणाले.
प्रास्ताविक करताना मधुकर बिरमने यांनी ‘ राष्ट्रवादीच्या माध्यमातून आडवा आडवी राजकारण सुरू असून या पार्श्वभूमीवर पांगारी ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील राजकारण व समाजकारण यांना कलाटणी देणारा ठरेल’, असे बोलताना सांगितले. यावेळी विकास शिंदे, किसन भिलारे, अविनाश फरांदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवाजी पांगारे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार किसनशेठ भिलारे यांनी मानले.
५९ जणांचा जाहीर प्रवेश तर, अजून इनकमिंग सुरूच राहणार…
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पांगारे यांच्या पुढाकाराने पांगारी येथिल सर्जेराव सयाजी पांगारे, आनंदा सयाजी पांगारे,तानाजी सयाजी पांगारे, किसन बाबुराव पांगारे, दत्तात्रय बाबुराव पांगारे, हिरालाल बाबुराव पांगारे, गणेश बाबुराव पांगारे, अण्णासाहेब नामदेव पांगारे, प्रकाश नामदेव पांगारे,दिपक किसन पांगारे,सुरज प्रकाश पांगारे, राजेश उत्तम पांगारे, वेनुबाई पांगारे, सोनाबाई पांगारे, पार्वती पांगारे, अनुसया पांगारे, मनिषापांगारे, दिपाली पांगारे, सुलाबाई पांगारे, सविता पांगारे, जयश्र पांगारे, प्रियांका पांगारे, यांच्यासहित ४५, ग्रामस्थांनी तर. तालुक्यातील अवकाळी २, भोसे ६,तायघाट ३,महाबळेश्वर शहर ३, एकूण ५९ जणांनी जाहीर प्रवेश केला.
पांगरी रस्त्यासाठी २५ लाखांच्या निधीला मंजुरी…
सध्या स्ट्रॉबेरीच्या कामामुळे लोक कामात व्यस्त असल्याने त्यांना पक्ष प्रवेश या मेळाव्यात करता आला नाही. लवकरच तेही लोक भाजपावासी झाल्याचे दिसेल, असा विश्वास माजी आमदार मदन भोसले यांनी व्यक्त केला. तसेच भौसे – पांगरी रस्त्याकरिता २५ लाख निधी मंजूर झाला असून लवकरच त्याच्या कामाचा प्रारंभ होणार असल्याचे सूतोवाच भोसले यांनी यावेळी केले.