सुरेश घाडगे
परंडा : शहर व तालुक्यातील समस्या सोडवून जनतेच्या सुख सुवीधेची सार्वजनिक व वैयक्तीक सर्व काम सर्व अधिकारी वर्गाने ८ दिवसात करावीत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबरला घेण्यात येणाऱ्या जनता दरबारात याबाबत आढावा घेवून विचारना केली जाईल. कामात दिरंगाई केली तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा सज्जड दम प्रशासकीय अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिला आहे.
परंडा येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आज मंगळवारी (ता .६ ) करण्यात आले होते. यावेळी बोलाताने वरील आदेश डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिले आहेत.यावेळी सावंत म्हणाले, परंडा शहरातील व तालुक्यातील मुख्य रस्ते यावरील खडडे बुजवून दुरुस्त करावेत. यासाठी तहसिलदार यांनी मुरूम उपलब्ध करुन द्यावा. नगर परिषदेने शहरात स्वच्छता व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, मुतारी सुविधा राबवावी तसेच पथदिवे बसवावेत. महावितरणने सुरळीत अखंडीत वीज पुरवठा सुरू ठेवावा. राज्य परिवहन परंडा बस आगाराने चांगली बससेवा द्यावी. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिक व शेतीच्या नोंदी घ्याव्यात.
बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा चोख बजवावी. परंडा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व यंत्रना व बंद पडलेल्या मशिन चालु कराव्यात. आदि कामे ८ दिवसात पूर्ण करावीत. आगामी जनता दरबार व आढावा बैठकीत याबाबत काम पुर्ण केल्याचा रिपोर्ट द्यावा. अन्यथा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे ना. सावंत यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले आहे.
दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने संप काळात परंडा आगारात ६ कर्मचारी कंत्राटी तत्वावर घेतले होते . या कर्मचाऱ्यांना आता कमी करण्यात आलेले आहे . या संबंधीत कर्मचाऱ्यांनी ना. सावंत यांना निवेदन देऊन कामावर घेण्याची मागणी केली . याबाबत परंडा आगारप्रमुख राहूल वाघमोडे यांना ना .सावंत यांनी विचारना केली असता, कंत्राटी कामगार कमी करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच झालेला आहे. असे उत्तर वाघमोडे यांनी दिले. त्यामुळे सावंत यांनी याबाबत पाठपुरावा केला जाईल. असे सांगितले.
मराठा समाजाच्या नोकरी व शिक्षणातील आरक्षणासह इतर महत्त्वाच्या प्रमुख मागण्यासाठी मोर्चा आंदोलन करत असले बाबतचे निवेदन ना. सावंत यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड तसेच सकल मराठा पदाधिकारी यांनी दिले. यासाठी सरकार सकारात्मक आहे. मीही एक घटक असून आपल्या समाजाला आरक्षण मिळालेच पहिजे. अशी माझी भूमिका पूर्वीपासूनच आहे. असेही सावंत यांनी सांगितले आहे.