सांगली : केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यत वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जर केंद्राने हा निर्णय घेतला तर त्याला आम्हा सर्वांचा पाठिंबा राहील. तामीळनाडूत आरक्षण 78 टक्क्यांपर्यंत नेलं जातं तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगलीमध्ये बोलताना उपस्थित केला.
पुढे बोलताना पवार म्हणाले, आरक्षण मिळावं अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. त्यात काही गैर नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळणारे आरक्षणही जपले गेले पाहिजे, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये. आरक्षणाच्या सध्याच्या पद्धतीनुसार 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही आणि जर आरक्षण 50 टक्क्यांच्यावर घ्यायचे असेल तर माझ्या मते कायदा बदलावा लागेल.
मराठा आरक्षणासोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही आरक्षण मिळावे आणि ते देखील कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, असंही शरद पवार म्हणाले.
Mumbai | On the Maratha reservation, NCP-SCP chief Sharad Pawar says “Everyone has this feeling that reservation should be given. There is nothing wrong with it. But while doing this, it should also be kept in mind that the reservation that other people are getting should also be… pic.twitter.com/odTqOOe2ss
— ANI (@ANI) October 4, 2024