पुणे : विधानसभा निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जुने प्रकरण उकरुन काढत देवेंद्र फडणवीस माझ्यावर सूड उगवित आहेत. रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न फडणवीस करीत आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता अनिल देशमुख यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरु झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता- न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.
अनिल देशमुख यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुन महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु इच्छितो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024
काय आहे प्रकरण?
गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.