अजित जगताप
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हती असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृतपणाने निषेध नोंदवला.
खटाव (वडूज) तहसीलदार कार्यालयाच्या समोर सकाळी भाजप पक्षाचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृतपणाने अजितदादा पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. शिवराळ घोषणाबाजी नाही , त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन नाही, असंसदीय भाषणबाजी नाही. अत्यंत शिस्तबद्ध व सुसंस्कृतपणाने भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देताना कुठेही शिवराळ भाषेचा वापर केला नाही. आपला निषेध हा लोकशाही मार्गाने व्हावा. याची खबरदारी घेण्यात आली.
या वेळेला भाजपचे नगरसेवक जयवंत पाटील, अनिल माळी,सॊमनाथ जाधव,अमोल गोडसे, प्रदिप शेटे, ओमकार चव्हाण,अमर जाधव,श्रीकांत बनसोडे, विकल्प शहा, महेश खडके, आकाश जाधव, धनाजी चव्हाण, जयवंत तथा बाबू गोडसे, सुधीर गोडसे, सोशल मीडिया प्रमुख शेखर पाटोळे,रवींद्र पवार, रवि काळे, रामभाऊ काकडे, संजय जाधव,मोहन बुधे,निलेश कर्पे, सॊमनाथ बुधे,सौरभ काकडे, ओंकार गुरव,सागर जगदाळे, बाबू पवार, शशिकांत पाटोळे,प्रदीप खुडे, तसेच खटाव तालुक्यातील अंबवडे, नडवळ, खटाव, कातर खटाव, मायणी,औंध,पुसेगाव, बुध, डिस्कळ, विसापूर सातेवाडी, कुमठे, गोरेगाव वांगी, गोपूज, निमसोड आधी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी हातात भाजपचा ध्वज घेऊन शांततापूर्ण निषेध नोंदवला.
आज खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने वडूज नगरीत शांततेत निषेध व्यक्त केला जातो याची प्रचिती पाहण्यास मिळाली. सर्वच सामाजिक संघटना, काही राजकीय पक्षांना आदर्श घ्यावी लागणार आहे. कोणत्याही वाहनाची अडवणूक अथवा लोकांची गैरसोय न करता चांगल्या पद्धतीने आंदोलन झाले तर खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली. असे म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. दरम्यान, वडूज नगरपंचायत मध्ये यानंतर सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी एकत्रित येऊन आदरणीय शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिकपणे विनम्र अभिवादन केले.