Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज्यातील समीकरणे बदलत आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष देखील अॅलर्ट झाला असून, पक्षाची महत्वापूर्ण बैठक राजधानी दिल्ली येथे बोलावली आहे. यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १२ बडे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे कायम ठेवायचे, की नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी द्यायची, याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर हे पद काँग्रेसकडे आलं तर कोणाला द्यायचं यावरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातील बडे नेते बैठकीसाठी दिल्लीस रवाना
काँग्रेसच्या बैठकीत पक्षातील अंतर्गत बदल आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Mumbai News) बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर हे महाराष्ट्रातील बडे नेते या बैठकीसाठी दिल्लीत रवाना झाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सध्या नाना पटोले यांच्याकडे आहे. पण त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. हे पद नाना पटोले यांच्याचकडे कायम ठेवायचं की नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी द्यायची याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी (Mumbai News) विरोधकांशी हातमिळवणी केल्यामुळे विरोधीपक्ष नेतेपद सझ्या रिक्त झाले आहे. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता काँग्रेसकडे हे पद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर हे पद काँग्रेसकडे आले तर कोणाला द्यायचे, यावरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेतील फूटीनंतर राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या उभी फूट पडली आहे. य दोन पक्षांनंतर (Mumbai News) आता काँग्रेसमध्येही मोठं बंड होणार असल्याची चर्चा आहे. हे बंड होऊ नये, यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते प्रयत्नशील आहेत. या मुद्द्यावर या बैठकीत चर्चेची शक्यता आहे.