Mumbai News : मुंबई : अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. दोन्ही गटांचे आज मुंबईत मेळावे सुरु आहेत. दोन्ही बाजू शक्तीप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या मेळाव्यासाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी जे सांगितलं करु नको, असे सांगितले होतो, तेच येथे केले आहे. शरद पवार यांनी कालच माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, त्यांच्याशी माझा वैचारिक संघर्ष आहे. त्यांनी माझा फोटो वापरू नये, असे ठणकावून सांगितले होते. असे असतानाही शरद पवारांचा फोटो वापरल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांचा फोटो वापरल्याने चर्चांना उधाण
दरम्यान, अजित पवार गटाकडून वापरलेल्या शरद पवारांच्या फोटोला खुद्द शरद पवारांनीच कडाडून विरोध केला होता. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा, हा माझा अधिकार आहे. (Mumbai News) मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असा सज्जड दम शरद पवार यांनी भरला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा साहेबांचा फोटो बॅनरवर दिसल्याने चर्चा होत आहे.
सध्या आमदारांची संख्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने आहे. विधिमंडळातील जवळपास ३२ आमदार अजित पवार यांच्या सभास्थळी उपस्थित आहेत. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या १४ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर दोन्ही बाजूंनी आपला दावा सांगितला आहे. (Mumbai News) दोघांनी परस्परांचे पदाधिकारी हटवून तिथे नव्याने नियुक्ती केली आहे. विधिमंडळापासून पक्षसंघटनेत नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत दोन्ही ठिकाणी दोन्ही गटाच्या नेत्यांची भाषणे सुरु आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : पवार साहेब, पक्षातील बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या; छगन भुजबळांची साद!
Mumbai News : शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा; म्हणाले, जिवंतपणी माझा फोटो…!