Mumbai News : मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली. शिस्तप्रिय आणि कोणाला त्रास न देता निघणाऱ्या वारीवर हल्ला करणं हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक आहे? वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन राहिलेला आहे. संत परंपरेला नेहमीच संपवण्याचे काम वैदिकांनी केले आहे. वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा आम्ही पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करतो, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. (The attack on Wari is indicative of which mentality? Prakash Ambedkar’s attack!)
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानप्रसंगी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Mumbai News ) आता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी वैदिक ब्राह्मण्यवादी वर्गाचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. राज्यातील राजकारण या घटनेमुळे तापले आहे.
पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरातील गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना केली. असं असतानाही काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. (Mumbai News ) या वेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. लाठीमार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत आहे. तसंच, याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.