Mumbai News : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर आज तिसऱ्या दिवशी मुंबईत दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या वेळी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात त्यांच्या मनात साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. घरात वडील ६० वर्षे झाल्यानंतर मुलाला सांगतात तु शेती तर मी तुला सल्ला देतो. उद्योगपतींमध्ये देखील ही पद्धत आहे. या संदर्भात मी सुप्रियाशी बोललो. आपण एका कुटुंबातील आहोत. एकत्र लहानाचे मोठे झाले आहोत. त्यांना काही तरी सांग. यावर सुप्रिया म्हणाल्या, ‘ते फार हट्टी आहेत. ते ऐकत नाहीत कोणाचे’. अजित पवार पुढे म्हणाले, ‘असला कसला हट्ट आहे. आम्हाला आदर आहे. पण आता हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले पाहिजे.’
‘वय ८३ झाले. तुम्ही कधी थांबणार आहात?
भाजपमध्ये निवृत्तीचे वय ७५ आहे, याचे उदाहरण देत अजित पवार यांनी थेट शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. ‘वय ८३ झाले. तुम्ही कधी थांबणार आहात? तुम्ही आशिर्वाद द्यावे, अशी आमची इच्छा आहे. (Mumbai News) तुम्ही शतायुषी व्हावे, अशीच आमची इच्छा आहे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत, मी त्याचे काम करतो, असे त्यांनी मला सांगितले. २ मेच्या आधीच्या मिटिंगमध्ये राजीनामा देतो असे सांगितले. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे ठरवले. सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही तयार झालो. पुन्हा दोन दिवसात असे काय झाले माहित नाही. राजीनामा दिला आणि नंतर मी राजीनामा मागे घेतो म्हणाले. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला’, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
आता सध्या आमदारांना फोन केला जातोय. ते उपलब्ध झाले नाही किंवा भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो. (Mumbai News) त्यांना भावनिक केले जाते. असे सांगित अजित पवार यांनी एका आमदाराचे उदाहरण दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आमच्यावर टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाय… सुप्रिया सुळेंचा सज्जड दम!