Mumbai News : मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आज वांद्रे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला केला. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. पण आज या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. या बडव्यांच्या तावडीतून आम्हाला आमच्या साहेबांना मुक्त करायचे आहे. साहेब, पक्षातील बडवे वेळीच ओळखा. या बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही सगळे तुमच्यासोबत यायला तयार आहोत, असे उद् गार छगन भुजबळ यांनी काढले.
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला
बंड केल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. भुजबळ म्हणाले की, नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही काहीही केलेले नाही.(Mumbai News) सकाळी उठलो आणि निर्णय घेतला असेही झालेले नाही. कायदे आम्हालाही कळतात. आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. २०१४ ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी का केला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.
अजित पवारांच्या आजच्या मेळाव्याला एवढ्या कमी कालावधीत हजारो लोकांनी उपस्थिती लावली. ४० हून अदिक आमदारांचे त्यांना समर्थन आहे. काही आमदार वाटेत आहेत. (Mumbai News) नव्या दमाने राष्ट्रवादी पक्ष मजबुतीने वाटचाल करणार आहे. विकासाच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. तुम्ही देखील आम्हाला साथ द्या, अशी साद भुजबळ यांनी शरद पवार यांना घातली.
भुजबळ यांनी पक्षांतर्गत नियुक्त्या रखडल्याचे सांगत जयंत पाटील यांना फटकारले. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका होत नव्हत्या. (Mumbai News) शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या रखडल्या. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस नेतृत्व नसल्यामुळे दिशाहीन झाले होते. काम थांबले होते. पक्षात सर्व समाजाला स्थान मिळणे गरजेचे असते. पक्षाची जबाबदारी अजितदादांना दिली असती, तर ही कामे रखडली नसती.
आमचा निर्णय घाईघाईने झालेला नाही. काही महिन्यांपासून वेगळा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, असा गौप्यस्फोट देखील भुजबळ यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा; म्हणाले, जिवंतपणी माझा फोटो…!