Mumbai News : मुंबई : शिवसेनेने आज प्रसिद्ध केलेल्या “त्या” भल्यामोठ्या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचा फोटो जाहिरातीतून का वगळला? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रामध्ये मोदी आणि राज्यात शिंदे ही घोषणा भाजप नेते, कार्यकर्ते देतील का? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Modi in the nation, Shinde in the state… Will BJP leaders make this announcement?; Ajit Pawar also targeted “those” advertisements!)
राज्यातील प्रसिद्ध दैनिकांमध्ये आज एक भलीमोठी जाहिरात सगळ्यांनी पाहिली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यात केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. (Mumbai News) तसंच एकनाथ शिंदे यांना एका सर्व्हेनुसार देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत, असंही दाखवण्यात आलं आहे. यावरुन विविध आरोप केले जात आहेत.
निवडणूका घ्यायची भीती वाटते
या प्रकरणावरून शिवसेनेला छेडताना अजित पवार म्हणाले की, विद्यमान सरकारला आता एक वर्ष पूर्ण होईल. अजूनही निवडणुका घेतल्या जात नाहीत. आता निवडणूका जाहीर करुन तुम्ही पावसाळा संपल्यानंतर निवडणूका घेऊ शकता. (Mumbai News) पण तुम्हाला निवडणूका घ्यायची भीती वाटते. जाहिरातींसाठी मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. शिवसेना आमचीच हा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीत मोदीसाहेबांचा फोटो लावला.
मोदींमुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंनी स्वतःचाही फोटो जाहिरातीत दिला आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सोयीस्कररित्या वगळणं हा त्यांचा अपमान नाही का? (Mumbai News) तुम्ही जनतेला सांगता, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढे नेत आहोत. बाळासाहेबांच्या विचारांपासून उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली आहे असं तुम्ही सांगत होतात, मग बाळासाहेबांचा फोटो जाहिरातीत का नाही? या प्रश्नाचे उत्तर द्या, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर… मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!