Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यानंतर दोन्ही गटांकडून पक्ष संघटनेवर वर्चस्व मिळवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. दोन्ही गटांतील नेते जिल्ह्यपातळीवरील नेत्यांशी संपर्क साधत असून, जास्तीत जास्त जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शरद पवार यांच्यावतीने जयंत पाटील यांच्याकडे संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजित पवार स्वत: जिल्हा स्तरावरील नेत्यांशी संर्पक साधत आहेत. या प्रकारामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. कोणता झेंडा घेऊ होती… अशी संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पक्ष संघटनेवर वर्चस्व मिळवण्याची चढाओढ
अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध जिल्ह्यात बैठका सुरु आहेत. कोणत्या गटासोबत जायचं, यावर स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचे विचारमंथन सुरु आहे. यावरून पक्षात दोन गट पडल्याचे दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जात आहे. (Mumbai News) पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकत दाखवून दिली. यानंतर आता अजित पवार यांनी उद्या मुंबईमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतून सर्व चित्र स्पष्ट होईल.
या सर्व घटना-घडामोडींनंतर प्रतिक्रीया देताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, “शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत, तर अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत. आमचा मात्र अभिमन्यू झाला आहे.” दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस कोणासोबत जाणार, कोणाला पाठींबा देणार, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. जिल्ह्यातील इतर तालुकाध्यक्षाशी चर्चा करुन रात्रीपर्यंत निर्णय घेऊ, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. (Mumbai News) राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील अध्यक्षांशी चर्चा करून रात्री निर्णय घेऊ. आम्ही शरद पवार यांचे का अजित पवार यांचे? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे, असंही प्रदीप गारटकर म्हणाले.
कोण कोणासोबत जाणार, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. आमदार आणि खासदारांशी चर्चा करून जिल्ह्याची भूमिका ठरवायची आहे. (Mumbai News) दरम्यान, उद्या होणाऱ्या बैठकीला पुणे जिल्ह्यातील काही कार्यकर्ते अजितदादांसोबत जातील, तर काही जण शरद पवार यांच्यासोबत जातील, असेही गारटकर यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : खूशखबर! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ… कोणाला दिलासा?