Mumbai News : मुंबई : राजकीय वर्तूळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत बिभत्स स्वरूपाचे दिसत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
व्हिडिओ प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता
सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हा मुद्दा अधिवेशनात उचलणार असल्याचेही दानवेंनी सांगितले.(Mumbai News) दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. कथित अश्लील व्हिडिओ प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आधीच यावरुन भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीत अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यांच्या खळबळजनक आरोपांमुळे अनेक नेते इडी, सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. (Mumbai News) आता सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतीर तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. (Mumbai News) याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे, अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांच्या मते, किरीट सोमय्या स्वत:च म्हणत असतील, तर तशी चौकशी करा. प्रत्येकाचे एक खासगी जीवन असते. कोणी कसे वागावे हा प्रत्येकाचा भाग आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. स्वतःहून ते म्हणतात, तर होऊ दे चौकशी.
किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर, जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, असे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधींचे अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. व्हिडीओची शहनिशा करुन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पहिजे, असं मत रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केले.
नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. (Mumbai News) अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलगा धरणात बुडाला अन् अनर्थ घडला