Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : राजकारणात खळबळ! सेक्स स्कँडलची भांडाफोड; किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 July 2023, 12:19

Mumbai News : मुंबई : राजकीय वर्तूळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत बिभत्स स्वरूपाचे दिसत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

व्हिडिओ प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता

सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हा मुद्दा अधिवेशनात उचलणार असल्याचेही दानवेंनी सांगितले.(Mumbai News)  दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. कथित अश्लील व्हिडिओ प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आधीच यावरुन भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीत अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यांच्या खळबळजनक आरोपांमुळे अनेक नेते इडी, सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. (Mumbai News) आता सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

याप्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतीर तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. (Mumbai News) याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे, अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांच्या मते, किरीट सोमय्या स्वत:च म्हणत असतील, तर तशी चौकशी करा. प्रत्येकाचे एक खासगी जीवन असते. कोणी कसे वागावे हा प्रत्येकाचा भाग आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. स्वतःहून ते म्हणतात, तर होऊ दे चौकशी.

किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर, जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, असे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधींचे अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. व्हिडीओची शहनिशा करुन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पहिजे, असं मत रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केले.

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. (Mumbai News) अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : कृपया आपण सकारात्मक विचार करुन… सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांना ट्विटद्वारे विनंती!

Mumbai News : थोरल्या पवारांच्या मनात चाललंय काय? अजितदादा गटाची आज पुन्हा मनधरणी; प्रफुल्ल पटेल म्हणाले,…

Mumbai News : वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलगा धरणात बुडाला अन् अनर्थ घडला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.