Mumbai News : मुंबई : सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. माझ्याकडे त्यांचे असे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा दानवे यांनी केला. अनेक महिलांनीही तक्रारी केल्या आहेत. त्या योग्य व्यासपीठावर मांडू, असेही दानवे यांनी सांगितले.
भाजप आणि ठाकरे गटात वादंग माजण्याची शक्यता
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या व्हिडिओंचे पेनड्राईव्ह घेऊन सभागृहात येत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळं आता यावरून भाजप आणि ठाकरे गटात वादंग माजण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या, नागडा तर तू झालेलाच आहे. उरलं सुरलं आज करतो. मी पेनड्राईव्ह घेऊन येतोय. भेटुया, सभागृहात. (Mumbai News) असं म्हणत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांचे आणखी व्हिडिओ पोस्ट करण्याचे संकेत दिले आहेत. अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह घेऊन येत असल्याचा इशारा दिल्याने विधानपरिषदेत मोठा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजप नेते देशाची संस्कृती, हिंदुत्व, अध्यात्म या विषयांवर भलीमोठी भाषणे देतात आणि त्याच पक्षाचा नेता अशाप्रकरे समोर येतो हे दुर्दैवी आहे. या घटना कुठे झाल्या, कशा झाल्या, कोणकोण आहे, याची चौकशी गृहमंत्रालयाने करावी. तसेच, भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. (Mumbai News) भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेक प्रकरणात ईडीकडे तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते असेही ऐकले आहे. अशा गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्याचा व्हिडीओ अशा प्रकारे समोर येत आहे, हे दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधानांशी माझे संबंध आहेत, ते माझ्या तालावर नाचतात असे म्हणून त्यांनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. त्या व्यासपीठावर योग्य वेळी मांडणार, असेही दानवे यांनी सांगितले. सोमय्या ही एक गलिच्छ प्रवृत्ती आहे. (Mumbai News) ते दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात. या विकृतीचा तिला आता जनतेला हिशेब द्यावाच लागणार, असेही त्यांनी सांगितले.