Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार भाकरी फीरवणार, अशी चर्चा गेली अनेक महिन्यांपासून राजकारणात होत होती. मात्र, कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे, याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्षांतर्गत बद करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. (Don’t give importance to Devendra Fadnavis’ words; Commentary of Ajit Pawar! Said…)
साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. (Mumbai News) ही तर निव्वळ धूळफेक आहे. राष्ट्रवादीतील फेरबदल किंवा अजित पवार नाराज असणे, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. मात्र, याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे.”
भाकरी फिरवली हे माध्यमांनी चालवलं
याबद्दल अजित पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “शरद पवार भाकरी फिरवण्याबद्दल काही बोलले का? भाकरी फिरवली हे माध्यमांनी चालवलं. देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत. (Mumbai News) त्यांनी काय म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण, पक्षांतर्गत भाजपाने काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. तसा राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे.”
आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे टीका-टिप्पणी करणं त्यांचं काम आहे. फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्वं दिलं पाहिजे, असं वाटत नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.