Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आज एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला असून, त्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पसंतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मागे असल्याचे जाहिरातीमध्ये दाखवले आहे. परिणामी राज्यभर ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’या जाहिरातीची चर्चा सुरू आहे. (Devendraji fell behind in advertising, Eknathji went ahead… Chandrasekhar Bawankule spoke clearly…!)
सरकारचा परफॉर्मन्स चांगलाच
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या जाहिरातीबाबत छेडले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही चांगलं काम करत आहेत. (Mumbai News) देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून लोकप्रिय बजेट मांडलं. सरकारचा परफॉर्मन्स चांगलाच आहे. सरकार सामान्य जनतेच्या पसंतीला उतरत आहे. सर्वेक्षणातून ते स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जाहिरातीमुळे देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले… या निष्कर्षाला काहीही अर्थ नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, शिवसेना आणि भाजपची महायुती हातात हात घालून काम करत आहे. एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्याही मनात परस्परांबद्दल चांगली भावना आहे. दोघांपैकी एकाला जास्त पसंती, हे ईर्ष्या दोघांच्याही मनात कधी डोकावत नाही. (Mumbai News) दोघेही पट्टीचे खेळाडू आहेत. यामुळे कोण पुढे, कोण मागे हे महत्वाचे नाही. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणे, हे त्यांच्या दृष्टिने जास्त महत्वाचे आहे. माझे एकच सांगणे आहे की, कोणीही जाहिरातीमध्ये अडकून न पडता, डबल इंजिन सरकारच काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, असं बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले की, कोणाचं महत्व कोणामुळे कमी होत नाही. ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्यावर आम्ही सध्या काम करतोय. कमजोर समजता म्हणून कोणी कमजोर होत नाही. (Mumbai News) जाहिरातीपेक्षा निवडणुकीतील पसंतीला जास्त महत्व आहे. त्यामुळे या जाहिरातबाजीत अडकू नका, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ही बाळासाहेबांची शिवसेना नाही; ही तर मोदींची ‘शवसेना’; संजय राऊतांचा घणाघात!
Mumbai News : वारीवर हल्ला हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल!