Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोरला पालखी मार्गावर ”निर्मलवारी” उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु ; परिसरात १ हजार मोबाईल शौचालये उभारली..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 13:17

हनुमंत चिकणे
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीचा दोन दिवसाचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन लाखो वारकऱ्यांसह ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी उद्या बुधवारी (ता. १४) लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मुक्कामी येत आहे. (Effective implementation of “Nirmalwari” initiative on Loni Kalbhor to Palkhi route; 1000 mobile toilets have been set up in the area.)

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर ”निर्मलवारी” उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. (Loni Kalbhor News) त्यानुसार २०२३ आपली वारी निर्मल वारी” मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १५ ठिकाणी १ हजार मोबाईल शौचालये उभारण्यात आली आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या माध्यमातून उभारणी

कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत १५ ठिकाणी महामार्ग प्रमुख संतोष दाभाडे, महामार्ग सहप्रमुख विशाल वेदपाठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या सहयोगाने मोबाईल शौचाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पालखी सोहळ्यात असणाऱ्या वारकऱ्यांच्या नैसर्गिक विधीची अडचण होते. लाखोंच्या संख्येने येणा-या वारक-याची सोय करणे ग्रामपंचायत प्रशासनाला पुरेश्या निधीअभावी शक्य होत नाही. हि अडचण ओळखून २००५ मध्ये पुणे शहराचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी या कामी पुढाकार घेतला होता. त्यानुसार त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर लोणी काळभोर व यवत येथे प्रत्येकी दोनशे मोबाईल शौचालये उभारण्यात आली होती. सदर योजनेस वारक-यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने शासनाने ती प्रतिवर्षी राबवून अनुदान देण्यास सुरुवात केली.

शौचालये उभारणीचे हे काम पुण्यातील सारा प्लाष्ट ही कंपनी करत आहे. यावर्षी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी तळ येथे १०० तसेच कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, स्वामी विवेकानंद नगर, (Loni Kalbhor News) संभाजी नगर येथे प्रत्येकी ५० व एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे २० याचबरोबर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत बाजार मैदानात २००, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज १००, भराडे आळी ६०, डाक बंगला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रत्येकी ५०, महादेव मंदीर ३० तसेच पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा १०, जिजाऊ गार्डन व कुंजीरवाडी फाटा येथे प्रत्येकी २०, गोविंद लॉन्स सोरतापवाडी येथे १०, तसेच उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी विद्यालय येथे २५ व पिराचे ठिकाणी ५ शौचालये उभारण्यात येणार आहेत.

दरम्यान, एका शौचालयाचे दहा सुट्टे भाग नट- बोल्ट व रिबेटच्या सहाय्याने एकत्र जोडून शौचालय अर्ध्या तासात ऊभारण्यात येते. यासाठी कंपनीच्या वतीने ९० कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते शौचालय उभारणी व स्वच्छतेचे काम करणार आहेत. पाण्यासाठी १५ टॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित राहूनही संबंधित गावांत घाण होत नाही. तसेच दुर्गंधी व रोगराई पसरत नाही.

याबाबत बोलताना महामार्ग प्रमुख संतोष दाभाडे म्हणाले, “संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत होती. २०१५ सालापासून हा उपक्रम राबवत आहोत. पहिल्या वर्षी ७० टक्के यश आले. काही नागरिकांनी या संदर्भात नावे ठेवली मात्र न खचता २०१५ सालापासून हि काम पुढे सुरूच ठेवले. यामुळे दिंडी अथवा पालखी सोहळ्यात स्वच्छतागृहाची सोय करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांचीहि संख्या वाढली आहे. तसेच गाव हागणदारीमुक्त होऊन परिसरात कोणत्याही प्रकारची घाण होत नाही. या उपक्रमामध्ये सर्वच सहकारी मोठे कष्ट घेतात. त्यामुळे ”निर्मलवारी” चांगल्याप्रकारे पार पडते.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सज्ज

Loni kalbhor News : … अन् ती मृत्यूच्या खाईतून सुखरूप परतली! विश्वराज हॉस्पिटलमध्ये बारा वर्षांच्या मुलीच्या मेंदूतील गळू काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

Loni Kalbhor News : अभिमानास्पद : लोणी काळभोर येथील खेळाडू सेजल सिंगने इतिहास रचला, आशियाई साँबो स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

Yavat News : शोरूममध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारसह १ लाख रुपयांची चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.