Mumbai News : मुंबई : शिवसेनेने राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीवरून वादंग उठले. सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिंदे गटात या जाहिरातीवरून वादाची ठिणगी पडली. यापूर्वी ठाण्यात युतीत ठिणगी पडली. भाजपा-शिंदे गटाचे नेते एकमेकांना भिडले. नंतर एकनाथ शिंदे यांना सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले. या सर्व प्रकरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडत आपली भूमिका जाहीर केली.
आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही
पालघरमध्ये आज (ता. १५) झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. (Mumbai News) त्यावेळी एक पत्रकार आला आणि आम्हाला प्रश्न विचारला की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं?” मी सांगितलं, “आमचा २५ वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही.” आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही एकत्रच असेल. कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही, तर हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे या हेतूने तयार केलं आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
युतीचे सरकार एवढे तकलादू नाही. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये वादंग उठणार नाहीत. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं, यावरून एकमेकांची गचांडी पकडणारे आम्ही पाहिले आहेत. (Mumbai News) मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे, असं म्हणत जाहिरातीवरील वादावर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : संजय राऊत धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर; अटक केलेला आरोपी राऊतांचाच निकटवर्तीय!