Mumbai News : मुंबई : राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दोन दिवसांपूर्वी शिवसेनेची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत ही जाहिरात होती. या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात दोन दिवस वादंग उठले. पुन्हा दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुधारित जाहिरात छापण्यात आली होती. आता या जाहिरातीला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
पुन्हा एकदा चर्चेला उधाण
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एक पोस्टर लावले. त्या पोस्टरवर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता छापण्यात आली आहे. (Mumbai News ) या कवितेचा अर्थ, बोटीचे वल्हे सुरक्षित हातात आहेत. त्यामुळे तुम्ही समुद्रातून सुखरूप बाहेर पडू शकता, असा आहे. या पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
भाजप कार्यकर्त्यांना सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षित हातात असल्याचं सूचवायचं आहे का? अशा चर्चेला आता सुरुवात झाली आहे. ‘सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार चीर चले सागर की छाती पार करे मझधार’ -अटल बिहारी वाजपेयीजी असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.
शिवसेनेकडून दोन दिवसांपूर्वी छापण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या जाहिरातीमुळे कार्यकर्ते नाराज झाले असून, मन दुखावणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. (Mumbai News ) थोडे मतभेद झाले, मात्र मनभेद नसल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
या जाहिरातीवर भाजपसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीदेखील जोरदार टीका केली. यामुळे दोन दिवस राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून औकातीची भाषा; चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेनेला सल्ला!