Mumbai News : मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १९) विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसेना नेते या वेळी उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना बसायला खुर्ची दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चांना ऊत आला आहे. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहे. विधान भवनात आल्याने त्यांची भेट घेतली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी भेट घेतल्याची चर्चा
राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार असलेले उद्धव ठाकरे हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून अधिवेशनात फारसे फिरकले नाहीत. (Mumbai News) मात्र, आज त्यांनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
दरम्यान, या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांना भेटलो. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे चांगलं काम करा, मूळ विषयाकडे दुर्लक्ष करू नका, असे त्यांना सांगितले. (Mumbai News) दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवार यांच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकीय जाणकारांमध्ये चर्चा आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. या दोघांमध्ये कधीही विसंवाद झाल्याचे पहायला मिळाले नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे घरातून सरकार चालवत असताना, अजित पवार मात्र सकाळी आठ वाजता आपल्या कार्यालयात हजर राहून कामे करत होते. (Mumbai News) महाविकास आघाडीने सध्याच्या सरकारविरोधात राज्यभर घेतलेल्या सभेतही अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर स्टेजवर बसलेले अनेकांनी पहिले होते. त्यांचे मैत्र असल्यामुळे ही भेट झाली असावी, अशी चर्चा देखील होत आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांना किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील महिलांनी त्या व्हिडिओबाबतचं उत्तर दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : भाजपमध्ये पुन्हा मोठे फेरबदल; जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर
Mumbai News : धक्कादायक! राज्यातील तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आधार अवैध!