Mumbai News : मुंबई : रस्ते, साधन-सुविधा विभागाचा पाचवा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या वेळी आपत्कालीन घटना घडल्यास अशा परिस्थितीत कोणत्या यंत्रणा असायला हव्यात, हे सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या यंत्रणा आणि कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले. (Abroad, the wind of the helicopter dried peaches; You use hair dryer… Raj Thackeray uttered harsh words!)
प्रशासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या यंत्रणा आणि कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते, यावरून निशाणा साधताना राज ठाकरे यांनी म्हटलं की,”आपत्कालीन यंत्रणा म्हणजे नाला तुंबणे नव्हे. रायगडवर मला काहीजण भेटले. त्यांनी चिपळूणवरून आल्याचं सांगितलं. (Mumbai News) ते म्हणाले गेल्या वर्षी पावसाने तडाखा दिला तेव्हा फक्त मनसे धावून आली. तुम्ही इथे भेटलात बरं झालं, कधीतरी आभार मानायचे होते. आज आभार मानतो.”
यावेळी त्यांनी परदेशातील आपत्कालीन स्थितीत यंत्रणा कशी काम करते हेसुद्धा सांगितले. राज ठाकरे म्हणाले की, अग्निशमन दल, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही कुटुंब असतं. (Mumbai News) नवरा बाहेर गेला आणि आग लागल्यावर कुठे फसेल? अशी चिंता घरच्या महिलेला असते. पोलीस खातंही असंच आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. समाजाच्या जाणीवा जिवंत असायला हव्यात. त्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांचे जास्त कौतुक व्हायला हवे असं राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी आयपीएल फायनलवेळी पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, जगभरात आपत्कालीन घटना घडतात. परदेशात असं काही घडतं तेव्हा त्यांच्याकडे काय काय व्यवस्था असते. दुबईतल्या शारजाह स्टेडियमचा फोटो पाहिला. (Mumbai News) पाऊस पडला तर पीक सुकवण्यासाठी यंत्रणा होत्या. याशिवाय त्यांनी हेलिकॉप्टर आणलं आणि त्याच्या वाऱ्याने पीच सुकवलं. आमच्याकडे उद्या मॅच आहे आज हेअर ड्रायरने पीच सुकवतोय. एवढ्या एवढ्या स्पंजने पीच सुकवायचं चाललंय. आजची मॅच उद्या होतेय, हे दुर्दैव आहे, असेही ठाकरे म्हणाले.