पुणे : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पर पडला आहे. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली.
— Ramesh Ahir (@RameshA92470031) August 9, 2022
”पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे,” असे ट्विट करत वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी @CMOMaharashtra लाही हे टॅग केले आहे.