मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणूका लवकरच लागणार असून त्यासाठी शिवसैनिकांनो कामाला लागा. असे स्पष्ट आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी शिवसैनिकांना दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मागील तीन महिन्यांचा आढावा घेण्यासाठी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली.
महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारला तीन महिने पूर्ण झाले आहे. दर दुसरीकडे, विरोधकांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील ४ मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. राज्यातील लोकांना विश्वास देण्यासाठी मोदींनी दोन पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले पाहिजे, सर्वांनी तयारीला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.