Maratha Reservation : जालना : मराठा आरक्षणाची सुरूवात ही जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये झाली. अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्ष झाला. नंतर त्याच रुपांतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे.
ऋषिकेश बेदरेवर कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदी पोलीस ठाण्यात हा गुन्हा गाखल करण्यात आला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपोषणास्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली आहेत.
ऋषिकेश बेदरेचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्यावर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर हे पिस्तुल त्यांच्याकडे कसं आलं याचा तपास पोलीस करत आहेत. यासंबंधीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
दरम्यान या लाठीचार्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर या लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी आदेश दिले नसल्याची माहिती समोर आली होती.