Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Body Election : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 13:19
local body election

photo- social media

Local Body Election : राज्याची तिजोरी नेमकी कोणाच्या हातात आहे, यावरून सध्या महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या वर्चस्वाचे दावे करतोय. या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. Local Body Election

ते म्हणाले, हल्ली कामावरून मतं मागत नाहीत, ‘पैसे देऊ, निधी देऊ’ असं सांगितलं जातं. ही पद्धत चांगली नाही. अर्थकारण पुढे करून निवडणुका जिंकायचा प्रयत्न असेल, तर त्यावर मी काही भाष्य करणार नाही.” पवार बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, “या निवडणुकीत फार राजकारण आणू नये, अशी भूमिका मी घेतली होती. पण आता पहिल्यांदाच दिसतंय की ठिकठिकाणी गट पडलेत. एक पक्ष दुसऱ्यासोबत जातोय. म्हणजे स्पष्टच आहे एकवाक्यता नाही. पण चालायचंच. लोक हवं तो निकाल देतात, आणि तेच योग्य असतं. माझ्यासारखे लोक याआधीही यात पडले नव्हते, आताही पडत नाहीत. आता दोन-चार दिवस राहिलेत, बघूया काय होतं.”

आरक्षण मर्यादेच्या मुद्दांवर काय म्हणाले पवार-

आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. “सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल सांगणं कठीण आहे. यावेळी ५० टक्के आरक्षण मर्यादा ठेवण्याबाबत न्यायालयाची भूमिका ठाम दिसते. दोन-तीन दिवसांत निकाल येईल, त्यामुळे आताच काही बोलणं योग्य नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना पवार म्हणाले-

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना पवार म्हणाले, “अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही ठिकाणी तर जमीनच वाहून गेली, आणि काही ठिकाणी साधनसामग्रीचं मोठं नुकसान झालं. राज्य सरकारने कर्ज वसुलीला एका वर्षाची स्थगिती दिलीय, ते ठीक आहे. पण एवढ्यानं भागत नाही. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान पाहता सरकारनं त्यांना थेट काही रक्कम द्यायला हवी होती. काही कर्जांवर व्याजमाफी देऊन त्यांचे हप्ते कमी केले असते, तर जास्त मदत झाली असती. आताची मदत पुरेशी नाही, असं मला वाटतं.”

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21
Next Post

गरम पाण्याने अंघोळ करताय? सावधान! त्वचेपासून केसांपर्यंत होणारे 'हे' मोठे नुकसान तुम्हाला माहीत आहे का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp