मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.
ईडीने कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा ईडीने संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान, संजय राऊतांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, अकाऊंटवर आलेले पैसे हे अनोळखी व्यक्तीने पाठवले, असल्याचे सांगितले होते. तर हे पैसे कुणी आणि का पाठवले याची चौकशी करायची आहे. असे सांगत ईडीच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ईडीने संजय राऊतांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मुक्काम ८ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत असणार आहे.