अफू व गांजाच्या शेतीस परवानगी मिळावी, यासाठी पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एका जिल्हास्तरीय नेत्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे ; ग्रामपंचायत कर आकारणीमुळे नेतेच बनले हतबल…!
विशाल कदम
उरुळी कांचन : अफू व गांजाची शेती करण्याची परवानगी मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एका जिल्हास्तरीय नेत्याने पत्राद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या अवाजावी कर आकारणीमुळे हतबल झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्याचे हि मागणी केल्याने सगळेच अवाक झाले आहेत.
कॉंग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खंडेराव चौधरी यांनी ही मागणी पत्राद्वारे केली आहे. तर चौधरी हे शेतकरी असून त्यांनी सन २००७ पासून कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग करत असून शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे बळी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत यांचा समावेश आहे.
कुक्कुट पालन आणि गाई म्हशी पालन हा व्यवसाय शेतीपुरक मानला गेला आहे. ज्याप्रमाणे शेती निसर्गावर अवलंबून असते, तसेच शेतकऱ्याच्या कोणत्याही पिकाला शासन हमीभाव देत नाही. त्याचप्रमाणे पोल्ट्री व्यवसाय देखील हा या लहरी निसर्गावरती आणि करार (कॉन्ट्रॅक्ट) करणाऱ्या कंपन्यावरती अवलंबून आहे.
शासनाने करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कंपन्यावरती नियंत्रण ठेवलेले दिसून येत नाही. म्हणून ते सर्रास पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे पिळवणूक करत आलेले आहेत. शिवाय शासन देखिल मालमता कर म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडून भरमसाठ करपट्टी आकारात आहेत. १९६०/१९९० या सारख्या शासन निर्णयाचीची अंमलबावणी केली नाही. रायगड जिल्ह्यात १३ पैसे/ स्क्वेअर फुट असा कर आकारला जात आहे. शासन पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश तेलंगणामध्ये १०० शेड आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील शासन काही ठिकाणी १३ पैसे स्वेअर फुट आकाराने पोल्ट्रीवर मालमता का आकारात असते.
चौधरी यांना २००७ साली शेड करण्यासाठी ८ लाख रुपये खर्च आला होता. तरी देखील ग्रामपंचायतने चौधरी यांच्या शेडचे बाजारमूल्य (व्हॅल्युएशन) रेडी रेकनरनुसार एक कोटी धरले आहे. त्यानुसार चौधरी यांच्याकडून कर भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे.
कोरांना काळापासून पोल्ट्री व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडला असून या व्यवसायाला शासन कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्यामुळे सदर व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा माझ्या कुटूंबाचाउदरनिर्वाह चालवण्यासाठी शेडमध्ये अफू व गांजा हे पिक घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी नंदकुमार चौधरी यांनी पुणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हवेली तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना कॉंग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार चौधरी म्हणाले की, राज्यात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमुळे, या व्यवसायाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यातच ग्रामपंचायतकडून व्हॅल्युएशन रेडी रेकनर वाढविल्यामुळे अव्वाच्या सव्वा कर आकाराला जात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी सानाजून घेऊन यातून तत्काळ मार्ग काढावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शेतात अफू व गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी आगळीवेगळी मागणी केली आहे. असे चौधरी यांनी सांगितले.