लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यास सत्तर टक्के नागरिकांनी नकार दिला असून कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच राहणार हे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायत करायचे का नको या विषयावर आज सोमवारी (ता. २९ )झालेल्या मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायत राहावी यासाठी १४३० पैकी तब्बल ९४५ नागरिकांनी नगरपंचायत करण्यास नकार दिला तर ४८५ नागरिकांनी नगरपंचायत व्हावी यासाठी कौल दिला.
कदमवाकवस्तीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांनी नगरपंचायत व्हावी यासाठी सोशल मिडीयासह विविध प्लॅटफॉर्मच्या आधारे जोर लावला होता. तर माजी सरपंच नंदू काळभोर, व माजी उपसरपंच ऋषि काळभोर यांनी ग्रामपंचायत राहावी यासाठी प्रयत्न केले होते. दोन्ही गटाने आपआपल्या गटांनी साम, दाम व दंड वापरण्यास सुरुवात केली होती.
यामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले होते. यावेळी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, सुभाष नरसिंग काळभोर, बाबाराजे काळभोर, प्रवीण काळभोर, मयूर कदम, ऋषिकेश काळभोर, सुनील कदम, निलेश काळभोर, सुशील काळभोर, शरीफ पठाण, नितीन लोखंडे यांनी कडाडून विरोध केला होता.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करायचे का नको यासाठी सोमवारी (ता. २९) मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत कदमवाकवस्ती हि ग्रामपंचायतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून फक्त औपचारीकता बाकी आहे. सदरचा निकाल हा येत्या दोन दिवसात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के पडताळणी करून देणार असल्याचे कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी जाहीर केले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करायचे का नको यासाठी नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी सोमवारी (ता. २९) बारा वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या मतदान प्रक्रियेत एकूण १४३० नागरिकांनी मतदान केले. यातील ९४५ मतदान हे ग्रामपंचायत राहण्यासाठी झाले तर राहिलेले ४८५ मतदान हे नगरपंचायत व्हावी यासाठी झाले. सदर निकाल जाहीर होताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत बचाओ कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोत्सव साजरा करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी घोषणाहि देण्यात आल्या. हि मतदान प्रक्रिया पर पडण्यासाठी ग्रामसेवक अतुल कोहिनकर, सुनील मुठेकर, प्रकाश गळवे, विलास भापकर, नथुराम ढवळे, आदि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, प्रियांका चौगुले, पोलीस हवालदार अजिंक्य जोजारे, महेश चव्हाण, तेज भोसले, घनश्याम आडके, ईश्वर भगत, दादा हजारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, मुकुंद रान्मोडे, संदीप धुमाळ लस्क्ष्मी यादव, नीलम सोनवणे, अश्विनी पवार, वैशाली निकम्बे, प्रियांका चौकटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन
ग्रामपंचायतीने मागील काही दिवसापासून ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी प्रत्येक प्रभागात कोपरा सभा घेऊन जनजागृती केली होती. तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत बचाओ कृती समितीच्या सदस्यांनी नगरपंचायत झाल्यानंतर होणारे तोटे याचा सोशल मिडीयासह विविध माध्यमाच्या आधारे जोर लावला होता. मात्र ग्रामपंचायतीने मतदानाच्या वेळेस नागरिकांना तिथे आल्यानंतर मतदानाची माहिती देण्यात आली.
यावेळी मतदानासाठी लाल व हिरव्या रंगाच्या कागदावर सह्या घेऊन मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे मतदान करायला आलेल्या तीन महिलांना कोणाला मतदान करायचे आहे व कशाचे मतदान आहे हे सुद्धा माहिती नव्हते.
यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “मतदान प्रक्रिया हि दहशतीच्या वातावरणात पार पडली आहे. त्याच्यामुळे ग्रामसभा हि रद्द करण्यासाठी हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे तक्रार दिली आहे. रजिस्टरवर सह्या करणाऱ्या नागरिकांना सह्या करून दिल्या नाहीत. तसेच गुप्त मतदान न करता दहशतीमध्ये मतदान झाल्याने व गोरगरीब नागरिकांना दहशत केल्याप्रकरणी हि ग्रामसभा रद्द करण्यासाठी तक्रार दिली आहे.