लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी जनसेवा पॅनेलच्या वतीने कल्पना बाबासाहेब काळभोर यांनी उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पॅनल प्रमुख नंदूपाटील काळभोर व विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांनी सरपंच पदासाठी कल्पना काळभोर यांची उमेदवारी जाहीर करुन, निवडणुकीच्या रणागणांत रंगत आणली आहे. कदमवाकवस्तीचे “सरपंच” पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” असुन, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे.
“सरपंच” पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” असल्याने कल्पना काळभोर यांनी गुरुवारी (ता. ०१) अर्ज केला आहे. तर दुसरीकडे कल्पना काळभोर यांच्या विरोधात चित्तरंजन गायकवाड यांनी मंगळवारी (ता. २९) सरपंच पदासाठी अर्ज केला आहे.
दरम्यान, “कदमवाकवस्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून विविध विकासकामे करण्यासाठी सज्ज असल्याचे अर्ज दाखल केल्यानंतर “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना काळभोर यांनी सांगितले.
यावेळी पॅनल प्रमुख नंदू काळभोर, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते प्रवीण काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, सुभाष काळभोर, अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील नाना कदम, बाळासाहेब कदम, ऋषिकेश काळभोर, प्रितम काळभोर, राजेश काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, देविदास कदम, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, रेखा दाभाडे, दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन टिळेकर, विशाल गुजर, आदी उपस्थित होते.