Maharashtra Politics : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली. आता त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, निवडणुकीतून माघार घेऊन जरांगेंनी घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. तर आपले सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांचं मासिक वेतन देण्यात येईल. तसेच शेतमाल हमीभाव कायदा करणार असल्याचं देखील वंचितने आपल्या जाहिरनाम्यात म्हटलं आहे. जाहीरनामा जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात बोलतांना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील यांचा विधानसभेतील रोल संपला असं आम्ही मानत नाही. सत्तर टक्के जागा ओबीसी समाजातील इच्छुकांना देण्यात आली आहेत. हे पाहता मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकतं. तसेच ओबीसीचे मतदान ही एकतर्फी होईल, अशी परिस्थिती सद्या आहे. ओबीसी समाज वंचितकडे वळाला आहे, असा आमचा दावा आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढा देत आहे. त्यामुळं हा वर्ग आमच्यासोबत येईल, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
आमचे १५ आमदार निवडून आले तरी येणाऱ्या सत्तेत आम्ही भागीदार राहू, असा असेही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या सभांना ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ९ नोव्हेंबरला सोलापूर येथून सभांना सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबाबत बऱ्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी प्रचार करेन, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
उंबरठे झिजवणारा वर्ग संपवायला हवा..
काय आहे जाहीरनामा सत्तेत सहभागी झाल्यानंतर आम्ही सोयाबीन आणि कापूसला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आम्ही ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस द्यायला लावणार आहे. राज्याची लोकसंख्या 13 कोटीच्या घरात आहे, त्यामुळं आता दोन लाख रोजगार निर्मितीची गरज आहे. उंबरठे झिजवणारा वर्ग संपवायला हवा. तेंव्हा घराणेशाहीचं राजकारण संपुष्टात येईल.
जरांगेंबाबत नेमकं म्हणाले प्रकाश आंबेडकर.?
माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात काकाला मतदान दिलं काय अन पुतण्याला मतदान दिलं काय? सत्ता ही कुटुंबात राहणार आहे. त्यामुळं एक खूणगाठ बांधून यातील किती लायक अन् किती नालायक आहेत. याबाबत स्पष्टता करून कोणाला मतदान करायचं नाही, हे जाहीर करायला हवं. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.